Thursday, 29 December 2016

नविन वर्ष व आजची तरुणाई

Output encoded/decoded text
येत्या काही दिवसात नवीन वर्ष येऊन ठेपणार आहे, त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी २-३ दिवसांआधी पासूनच तयारीला सुरवात होते.
आजकाल नवीन वर्षाचे स्वागत करण्याची पद्धती मधे खूपच आमुलाग्र बदल झालाय, विशेषकरून तरुण मंडळींची जल्लोष करण्याची पद्धत फारच बदलली आहे..

आता नवीन वर्षाचे कार्यक्रम ठीक-ठिकाणी असे साजरे होताना दिसतात,जसे की हा दिवाळी पेक्षा ही मोठा सण आहे. मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्स ,रेस्टॉरंट, दुकाने, मॉल्स प्रचंड रोषणाई करतात; मोठमोठ्या सिने कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करून तरुणाई ला आकर्षित करतात व प्रचंड प्रवेश फी घेतात..

आजच्या काही वर्षांपूर्वी फारतर १५-२० वर्षांपूर्वी संपूर्ण कुटुंब ३१ डिसेंबर च्या रात्री एकत्र जमून रात्री टीव्ही वरील कार्यक्रम बघून वा सोबत जेवणात काही गोड-धोड खाण्याचा आनंद घेऊन नवीन वर्षाचे फार मजेत स्वागत करत..

परंतु आता नवीन वर्ष तर सोडाच परंतु इतरही अनेक दिवसांमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सण वा कार्यक्रम साजरे करताना दिसत नाहीत.
हा आजच्या काळातील बदल आपल्या जीवन पद्धतीत घडलेला आमुलाग्र बदलच आहे, ह्याला जबाबदार नेमके कोण आहे ह्याचे उत्तर मिळणे थोडे कठीणच आहे..
सध्याची जीवनशैलीच ह्याला कारणीभूत ठरलेली आहे, आता प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झालेला अथवा कमीतकमी व्यस्तता दाखवतो .

शिक्षण पुढे नोकरी ह्यामुळे घर बाहेर राहावे लागत असल्यामुळे हा प्रश्न आता अधिकच बिकट होत चाललेला आहे..
आजकालचा तरून वर्ग हा स्वत:च्या आई-वडिलांपेक्षा आपल्या मित्र-मैत्रीणीना अधिक जवळ मानायला लागला आहे..
ह्याल कारण मुलांचा पालकांशी कमी झालेला संवाद असा होऊ शकतो.
 का झाले ह्यापेक्षा पुढे होऊ देऊ नये हे जास्त महत्वाचे आहे..



No comments:

Post a Comment