Wednesday 13 April 2016

दुष्काळ : एक समस्या,अनेक उपाय

Output encoded/decoded text
माणसात एक (अव)गुण आहे, तो म्हणजे "कुठलेही काम योग्य रीतीने न झाल्यास,दुसऱ्यावर दोषारोपण करणे"
ह्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना आपण करतोय; दुष्काळावर मात देण्यासाठी सरकार काय करते किंवा सरकारने काय करायला पाहिजे ह्यालाच आपण सर्व दोष देत राहतो; परंतु दुसऱ्याने काय केले किंवा काय केले पाहिजे ह्यापेक्षा आपण काय करू शकतो ह्यावर विचार केल्यास ह्याच नाही तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सापडणे हे कठीण काम नाही..
सर्वात आधी तर दुष्काळाची परिस्थिती आणणारे आपण स्वताच आहोत; आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठीच वृक्षतोड करून पर्यावरणाचा ह्रास आपण करतोय.
सरकारने इतर कामासोबतच दुष्काळावर मात देण्यासाठी काही उपाययोजना करायला पाहिजे असे आपण सर्वच नेहमी चर्चेत बोलतो, परंतु स्वत पुढाकार घेऊन काही करत मात्र नाही..
सरकार जे करेल ते करेल पण सर्वात आधी आपण आप-आपल्या परीने काही मदत करायला हवी...
प्रत्येकाने किमान २ झाडे जरी जागवली तरी ह्या पृथ्वीवर नंदनवन तयार होयील...

No comments:

Post a Comment